रत्नागिरी :२० जानेवारी रोजी विभागीय वनाधिकारी, कांदळवन विभाग दक्षिण कोकण, अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली कांदळवन कार्यालय रत्नागिरी, कांदळवन प्रतिष्ठान मुंबई आणि ECRICC Project आणि मत्स्य तंज्ञनिकेतन महाविद्यालय, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे शिरगाव, रत्नागिरी येथे कांदळवन स्वच्छता मोहिम उपक्रम राबविणेत आला.
सदर कार्यक्रमाला मत्स्य तंज्ञनिकेतन महाविद्यालय, शिरगावचे एकूण २५ विद्यार्थी, शिक्षकंद, कांदळवन प्रतिष्ठान व युएनडीपी जीसीएफ यांचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे दरम्यान श्री. किरण दौलत ठाकूर, वनक्षेत्रपाल कांदळवन रत्नागिरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कांदळवन जैवविविधता तसेच कांदळवनास असणारे मानवनिर्मित धोके याबाबतची माहिती दिली.
सदर कार्यक्रमास डॉ. आशिष मोहिते, प्रायार्च/सहयोगी अधिष्ठाता, श्री तौसिफ काझी, डॉ. राकेश जाधव, श्री. निलेश मिरजकर, श्री. रोहित बुरटे, सहा. प्राध्यापक व श्री, सुशील कांबळे, राष्ट्रीय सेवायोजना समन्वयक हे उपस्थित राहिले.