चिपळूण- येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयातील महिला विकास कक्षि तर्फे विद्यार्थिनींसाठी विविध प्रशिक्षणांचं आयोजन केले जाते .यावर्षी देखील विद्यार्थिनींना विविध प्रकारचे मसाले प्रशिक्षण तसेच पुष्पगुच्छ सजावट स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देण्यात आले.
या प्रमाणपत्र वितरण समारंभामध्ये चिपळूण येथील प्रसिद्ध वकील ॲड. नयना उदय पवार यांना आमंत्रित केले होते. त्यांनी आपल्या मनोगतात मुलींना कलागुणांद्वारे भविष्यात व्यवसायाची, नोकरीची संधी उपलब्ध होते आणि महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या सर्व प्रशिक्षणात त्यांनी सहभाग घेऊन त्याचा भविष्यात फायदा करावा असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापट,उपप्राचार्य तळप , पर्यवेक्षिका कुलकर्णी ,रजिस्ट्रार कलकुटकी सर यांचे मार्गदर्शन लाभले .तसेच महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. दिशा दाभोळकर आणि सदस्य प्रा.तृप्ती यादव; प्रा.सौ.जाधव; प्राध्यापक सोहोनी; प्रा.सौ. उज्ज्वला कुलकर्णी ;प्रा.कांचन तटकरे; प्रा.सुचिता दामले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तृप्ती यादव . यांनी केले तर प्रा.सौ. उज्वला कुलकर्णी यांनी आभार मानले.