मनोहर धुरी / राजापूर:-तालुक्यातील बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. भरवस्तीत घुसून बिबट्याने अनेक गुरांचा फडशा पाडला आहे. दिवसेंदिवस या प्रकरांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 19 जानेवारी रोजी पडवे येथील एका शेतकऱ्याचा साडेतीन वर्षाचा पाडा बिबट्याने ठार केल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. पडवे येथील शेतकरी अनिल गणपत भोसले यांच्या मालकीचा हा पाडा आहे. त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच याच गावातील अनिल भोसले यांचाही बैल बिबट्याने मारल्याने त्यांचेही हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित यंत्रणेने पंचनामा केला असून नुकसान भरपाई लवकरच मिळावी अशी मागणी पडवे परिसरातून होत आहे.