मुंबई:-प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ २५ जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती १९ जानेवारीपर्यंत मागविण्यात आली आहे. केंद्राचा १९ वा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारीत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरीत होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
‘ॲग्री स्टॅक’ ॲपवरुन मिळणार वस्तुनिष्ठ माहिती
शेतकऱ्यांना त्यांच्या स्वत:च्या मोबाईलवरुन किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पीक कर्जाच्या मागणीचा अर्ज भरता यावा, शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची व सवलतीची माहिती एकाच ॲपवरुन मिळावी, या उद्देशाने ‘ॲग्री स्टॅक’ ॲप तयार केले आहे. प्रत्येक शेतकऱ्याची रियल टाईम माहिती अधिकाऱ्यांना लगचेच मिळणार आहे. शेती विकल्यावरही अनेकजण सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत, पण त्याची माहिती चार-सहा महिन्यानंतर समजते. आता हा प्रकार ॲपमुळे बंद होणार आहे.