संदीप घाग/चिपळूण : तालुक्यातील टेरव -अडरे गावच्या सीमेवर कोळसाभट्टी आढळून आली आहे. ही भट्टी उध्वस्त करून कोळसा जप्त करण्यात आला आहे.
वनविभागाच्या पथकाने टेरव- अडरे गावच्या सीमेवर अवैध कोळसा भट्टीवर कारवाई करून सदरची भट्टी उध्वस्त केली आहे. तर या ठिकाणी तयार झालेला कोळसा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष राजाराम कदम ( रा.टेरव ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई. सहाय्यक वन संरक्षक प्रियांका लगड, परिशेत्र वनाधिकारी. सरवर खान यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस एस सावंत, राहूल गुंठे, वनरक्षक कोळकेवाडी यांनी केली.