सावर्डे/संदीप घाग:-कोकणातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी चतुरंग प्रतिष्ठान चिपळूण च्या संस्थेचा मानाचा समजला जाणारा आदर्श विद्यार्थी गोडबोले पुरस्कार स्व. गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे ची कु. आर्या वृषाली रामचंद्र नांदिवडेकर हिला प्रख्यात लेखक व अभिनेते मा. श्री.दिपक करंजीकर यांच्या शुभहस्ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.मिलिंद गोखले, डॉ.प्रसाद देवधर, सौ.रमा करमरकर उपस्थित होते.
आर्याने इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यत विविध उपक्रमात, तालुका, जिल्हा,राज्य, राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. वाचन,वक्तृत्व तिचा छंद असून अबॅकस, तायकॉदो,बॉल बॅडमिंटन, चित्रकला, रांगोळी, यामध्ये विशेष अभिरुची आहे.नियोजनबद्ध अभ्यास, स्वयंआकलन करणे, यामुळे सर्व स्पर्धेत यश मिळविणे सोपे जाते, असे आर्या म्हणते. स्पर्धा परीक्षेची विशेष आवड जोपासणाऱ्या आर्याला शाळेचा 2024-25 चा आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार तर तिच्या या चतुरस्त्र यशाची दखल चतुरंग प्रतिष्ठान चिपळूण ने घेऊन यावर्षीचा जिल्ह्यात मानाचा समजला जाणारा आदर्श विद्यार्थी गोडबोले पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
या यशाबद्दल आर्याचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.
आर्या नांदिवडेकर हिला चतुरंग प्रतिष्ठान चिपळूण चा गोडबोले पुरस्कार प्रदान
