संगमेश्वर : तालुक्यातील परचुरी गावचे सुपूत्र महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ रत्नागिरी येथे कार्यरत असणारे विश्व समता कलामंच लोवले संगमेश्वरचे संघटक जनार्दन तुकाराम पवार
यांची दिव्यांग व्हिलचेअर क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
ही क्रिकेट स्पर्धा पूर्णतः व्हिलचेअर बसून बाँलिग, बँटिग, फिल्डिंग केली जाते. त्यामुळे साहजिकच दिव्यांग्याचे मनोबल वाढविणारी ही अनोखी क्रिकेट स्पर्धा हैद्राबाद येथे खेळविली जाणार असून महाराष्ट्र विरुद्ध तेलंगणा यांच्यामध्ये हा पहिला क्रिकेट सामना होणार आहे. जनार्दन पवार यांनी आतापर्यंत विविध क्रीडा स्पर्धेत दिल्ली पर्यंत मजल मारली आहे.
संगमेश्वर परचुरीतील दिव्यांग जनार्दन पवार यांची व्हिलचेअर क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
