–प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी घेतला कामकाजा आढावा
-जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अधीक्षक अभियंता यांचीही उपस्थिती
मंडणगड : येथील दिवाणी न्यायालयाच्या पूर्णत्वास जात असलेल्या नवीन इमारतीचे बांधकाम व अन्य सुविधा यांची पाहणी करण्यासाठी रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी, मुख्य न्यायादंडाधिकारी निखिल गोसावी यांनी शनिवारी मंडणगडला भेट दिली. यावेळी त्यांनी इमारत कामकाजा आढावा घेत संबंधित अधिकाऱयांना साना केल्या.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक विजय चव्हाण, प्रांताधिकारी अर्चना बोंबे, तहसीलदार अक्षय ढाकणे, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमरदीप रामसे आदी अधिकारी उपस्थित होते. मंडणगडमध्ये 8 ऑक्टोबर 2023 रोजी दिवाणी न्यायालय सुरु करण्यात आले.
यावेळी दिवाणी न्यायालयासाठी स्वतंत्र व सुसज्ज अशी स्वमालकीची इमारत असावी, यासाठी जागेची उपलब्धता करून न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. या इमारताया बांधकामा आढावा व पाहणीदरम्यान जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश गोसावी यांनी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या ठिकाणी संबंधित अधिकाऱयांच्या उपस्थितीत भेट दिली. त्यांनी संबंधित अधिकाऱयांना मार्गदर्शक सूचना दिल्या. यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
यावेळी मंडणगड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. मिलिंद लोखंडे, उपाध्यक्ष ऍड. सचिन बेर्डे, नायब तहसीलदार संजय गुरव, सुदर्शन खानविलकर, पोलीस निरीक्षक नितीन गवारे, मंडळ अधिकारी नीलेश गोडघासे, प्रकाश साळवी, गटविकास अधिकारी विशाल जाधव, नगर पंचायत मुख्याधिकारी अभिजित कुंभार, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता एम. बी. सस्ते, अभियंता माधव कोंडविलकर, किरण कुळधर उपस्थित होते.
मंडणगड दिवाणी न्यायालय इमारतीची न्यायाधीशांकडून पाहणी
