रत्नागिरी : एसटी प्रवासादरम्यान चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या वृद्ध प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १६) सकाळी घडली. सोना पांडुरंग नेवरेकर (वय ८५, रा. करबुडे काजरेकोंड, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.
गुरुवारी सकाळी ते विजयदुर्ग ते रत्नागिरी असा एसटीने प्रवास करत होते. त्यांची एसटी सकाळी ८.५० वा. सुमारास भाट्ये दर्गा येथे आली असता नेवरेकर यांना चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. एसटीतील इतर प्रवाशांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
करबुडे काजरेकोंड येथील वृद्धाचा प्रवासादरम्यान मृत्यू
