रत्नागिरी : तालुक्यातून हापूसची पहिली आंबा पेटी पाठवण्याचा मान पावस महातवाडी येथील शकील उमर हरचिरकर आणि चांदेराई येथील रेहान जब्बार बंदरी यांनी मिळवला आहे. हरचिरकर यांच्या दोन आंबा पेट्या मुंबईत वाशी बाजारात तर बंदरी यांच्याकडून सहा डझनच्या दोन पेट्या गुजरात मार्केटमध्ये रवाना झाल्या आहेत. अहमदाबादमध्ये बंदरी यांना 25 हजार रुपये दर मिळाला.
पावस महातवाडी येथील शकील हरचीरकर यांच्या गोळ्या धनगरवाडी येथील बागेतील हे हापूस आंबे आहेत. पेटी लवकर पाठवण्याचे हे त्यांचे चौथे वर्ष आहे. एक एकरात 40 हापूस आंब्यांची झाडे घेतात. चार ते पाच वर्षे ते स्वतः योग्य नियोजन करून हापूसची काढणी करतात. भर पावसात म्हणजेच सप्टेंबरमध्ये आलेला मोहर टिकवण्यासाठी तीन ते चार फवारण्या केल्या जातात.
ऊन पडल्यामुळे मोहराला फळधारणा झाली त्याचे जतन करत 16 जानेवारीला दहा डझन आंबा काढला आंब्याच्या दोन पेट्या मुंबई वाशी मार्केट मधील शैलेश नलावडे यांच्याकडे विक्रीसाठी पाठवल्या शुक्रवारी त्या वाशी बाजारात पोहोचल्या नलावडे यांच्या हस्ते पहिल्या पेटीची पूजा झाली चांदी नाही येथील रेहान जबर बंदरी यांच्या बागेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोहोर आला. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता, मात्र मोहोर वाचवण्यासाठी बंदरी यांनी आठ दिवसांनी फवारणी केली. ऑक्टोबर अखेर फळधारणा सुरू झाली गुरुवार 16 जानेवारी रोजी काढणी करून आंबा अहमदाबाद मार्केटला पाठवण्यात आला.