मुंबई : आपण अनेकदा पाहतो, शाळेतील तसेच ऑफ़िसच्या डब्यातील पदार्थ, चपात्या, रस्त्यावरील खाद्य पदार्थ सर्रासपणे वर्तमानपत्र, प्लास्टिक, ॲल्युमिनीयम, फॉईलमध्ये गुंडाळले जातात. त्याचा खाद्यपदार्थांवर काय परिणाम होतो तसेच त्याहून अधिक आपल्या आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतो, याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते, तुम्हाला कदाचित माहित नसेल पण यामुळे कळत-नकळत आपण कॅन्सरसह इतर जीवघेण्या आजारांना आमंत्रण देतो.
खाद्यपदार्थ वृत्तपत्रात बांधले जातात खरे.. मात्र शाईमध्ये अतिशय घातक असे केमिकल असतात. जे बायोएक्टिव्ह असल्याने आपल्या शरीरात गेल्यामुळे त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. प्रिंटिंगच्या शाईमध्ये शिसे आणि जड धातूंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अशा वेळी कागदात अन्न बांधून ठेवल्यास ते रसायन अन्नाच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. FSSAI भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार कागदावर जीवाणू, विषाणू देखील मोठ्या प्रमाणात असतात. हे जीवाणू, विषाणू अन्नात जाऊन त्या आहाराचा तुमच्या आरोग्यावर गंभीर आजार होऊ शकतो. खास करुन पोटाशी संबंधित विकाराचा धोका निर्माण होतो.
अनेकदा डब्यात दिली जाणारी चपाती, सॅंडविच, तसेच रस्त्यावरील पदार्थ पॅक करण्यासाठी प्लॅस्टिक आणि ॲल्युमिनियम फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यातूनही घात रसायनं अन्नामध्ये उरतात, त्यामुळे यातील आरोग्याला हानी पोहोचू शकते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स यामध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, अॅल्युमिनियम फॉइलमधून वेगवेगळ्या उत्तेजकांमध्ये, विशेषतः डिस्टिल्ड वॉटरमध्ये तसेच अम्लीय आणि अल्कधर्मी द्रावणात बाहेर पडतात. अन्नात बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणून त्यातील पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
प्लास्टिक, कागदातून खाद्यपदार्थ खाल तर कॅन्सरला आमंत्रण द्याल!
