गुहागर / अमित भुवड:-“कोकणच्या लाल भुमित गुहागर” तालुक्यातील शीर गावचा सुपुत्र एक अष्टपैलू लोककलावंत अशोक यशवंत मोरे यांनी *नमन* लोक कलेत १९९३ रोजी पदार्पण केले. कोकण म्हटल तर अनेक लोक कलावंतांचे माहेर घर. अशाच कोकणातील अनेक लोककला आहेत, त्यातील प्रामुख्याने “नमन” या लोककलेचा उल्लेख होतो. अशा अनेक नमन कलेतुन तसेच विविध “नाटकं” यामधून आपल्या कलागुणांचा ठसा उमटवून कोणत्याही मिळालेल्या भूमिकेला एका विशिष्ट उंचीवर नेवून ठेवणारा गुहागर तालुक्यातील शीर येथील पश्चिम मोरेवाडीचे सुपुत्र अशोक यशवंत मोरे उर्फ आप्पा.
नमन म्हंटल की शीर मधील पश्चिम मोरेवाडीतील “नमन” हे अग्रेसर असे, आहे. आणि या नमनातील आप्पांचा अभिनय म्हणजे रसिकांसाठी एक वेगळीच पर्वनी असे. त्यांच नमनातील स्त्री पात्र हे एक लक्षवेधी भूमिका. एखाद्या स्त्रीला ही मागे टाकेल अशी त्यांची भूमिका प्रेक्षकांना भुरळ पाडत असे. (१) पंढरीची वारी, (२) श्री स्वामी समर्थ, (३) सत्व परीक्षा, (४) श्री साईबाबा, (५) ताटी उघडा ज्ञानेश्वरा, (६) सती अनसूया (७) गोर कुंभार (८) सत्यवान सावित्री अशा अनेक “वगनाट्यातुन” स्त्रीची भुमिका सुंदर सादन केल्या. त्यातीलच अनेक वर्षे “वारी पंढरीची” य वगनाट्यातील “संत सखूबाई” ची भुमिका अजरामर केली. अनेक वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवल.. असा एक नामवंत कलाकार असूनही जमिनीवर पाय घट्ट रोवून ठेवलेला. “कलाकार” मी तरी आजतगायत पाहिलेला नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांना सुरुवाती पासून ते शेवटपर्यंत बसण्यास ते भाग पाडत असत. अशा अनेक भक्तिमय नाट्य कलाकृती त्यांच्या अभिनयामुळे गाजल्या.
नमन मध्ये काम करता करता त्यांनी नाटक क्षेत्रात सन १९९७ रोजी काम करण्यास सुरुवात केली, मूळचा रक्तातच अभिनय आणि रंगभूमीची प्रामाणिक सेवा करणारा हा अष्टपैल कलाकार नाटकातही आपली एक वेगळी छाप पाडू लागला. भूमिका छोटी असो वा मोठी पण प्रेक्षकांच्या लक्षात राहिल असा त्यांचा अभिनय निश्चितच असतो. प्रती वर्षी एक वेगळं पात्र ते साकारत असतात कधी विनोदी तर कधी प्रेमळ अशी त्यांची भूमिका नाटकाला अगदी वेगळ रूप देऊन जाते. पडद्या मागे असणारा हा एक विलक्षण कलाकार उत्कृष्ट दिग्दर्शक सुद्धा आहे. शीर गावंच नाव आपल्या अभिनयातून भविष्यात नक्कीच उंचावेल…! यांत तिळमात्र शंका नाही. अर्थातच त्यांच्यामागे रंग देवता, कुलदेवत आणि कुटुंबातील सर्व सदस्याचे आशिर्वाद आहेत.