खेड : तालुक्यातील खोपी फाटा येथे गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या बाबू बाळाजी गोरे (36) याला येथील पोलिसांनी डमडम रिक्षासह रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 35 लिटर गावठी हातभट्टीच्या दारू व रिक्षा असा 2 लाख 45 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. दारू नेमकी कुठून आणली, या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.