जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या सूचना
रत्नागिरी:-राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने सर्व रूग्णालय, दवाखान्यांना अधिसूचना जारी करत सर्व रुग्णालयांना दर्शनी भागात दरपत्रक लावणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही या रुग्णालयांनी ही अधिसूचना गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे येत्या महिनाभराच्या आत म्हणजे फेब्रुवारीपूर्वी दिलेल्या सूचनांची पूर्तता करावी. जर तपासणीत त्रुटी आढळून आल्यास त्या रुग्णालयाचे, दवाखान्याचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले.
शासनाच्या आरोग्य विभागाच्या कायद्यानुसार प्रत्येक खासगी रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक लावणे आवश्यक आहे. मात्र, अनेक शहरातील वा ग्रामीण भागातील बहुतांश खासगी रुग्णालये, तसेच दवाखाने याचे पालन करत नसल्याचे दिसले आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने या बाबत अधिसूचना जारी करत सर्व खासगी रुग्णालयांना दर्शनी भागात दरपत्रक लावणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्यापही या रुग्णालयांनी ही अधिसूचना गांभीर्याने घेतली नाही. लवकरच या बाबत आरोग्य विभागाच्या निर्देशांनुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयात उपचाराचे दर हे एकसमान नसून जो तो आपापल्या पद्धतीने त्यांचे शुल्क आकारत असतो. त्यामुळे अनेकवेळा रुग्ण तेथे गेले की, त्या रुग्णाला उपचाराच्या शुल्काची माहिती नसते. त्यामुळे अनेकवेळा रुग्ण भरती झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकाला जेव्हा बिल दिले जाते, त्यावेळी अचानक मोठया रकमेचे बिल आल्याने त्याची भंबेरी उडते. अशावेळी रुग्णाच्या नातेवाईकाला या ठिकाणी इतका खर्च येणार आहे, हे माहिती असल्यास रुग्णाला त्या रुग्णालयात दाखल करायचे की नाही, याचा निर्णय त्याला घेणे शक्य होते.
आरोग्य विभाग कायद्यानुसार नोंदणी करून घेत असतो. तसेच त्याच्या अंमलबजावणीचे काम पाहत असतो. दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. तसेच रुग्ण हक्क संहिता देण्यात आली आहे. त्यामधील नियमांनुसार रुग्णालयात पुरवण्यात येणाऱया सेवा उपचार, त्याचे आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे दर सविस्तर दर्शवणारे दरपत्रक छापील स्वरूपात शुश्रूषागृहाच्या मुख्य दर्शनी भागात ठळकपणे लावावे. जेणेकरून रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना, नागरिकांना कोणत्या आरोग्य सुविधा भेटणार याची महिती मिळेल. तसा प्रत्येक ाग्णालयांनी वेळोवेळी यापूर्वी घडलेल्या आगाया घटनांया पार्श्वभूमीवर फायर ऑडिट करून घेणेही बंधनकारक आहे. जेवढे ाग्णालयात डॉक्टर असतील किंवा बाहेरून येणारे डॉक्टर असतील तर त्यों रेनिवल झाले की नाही, हे देखील पहावे. न झाल्यास त्या डॉक्टरांना बोगस डॉक्टर म्हणून संबोधले जाऊ शकते.
त्रुटी आढळल्यास कारवाई करणे क्रमप्राफ्त
जिल्हÎातील सर्व ाग्णालये, दवाखाने यांनी खबरदारी घेत जानेवारी महिना संपायाया आत सर्व बाबीं पूर्तता करावी. अन्यथा फेब्रुवारीपासून सुरू केल्या जाणाऱया तपासणीत त्रुटी आढळल्यास कारवाई करणे क्रमप्राफ्त ठरणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले.