रत्नागिरी:- रत्नागिरीतील शिरगावमध्ये एका बांगलादेशीला स्थानिकत्वाचा दाखला दिल्याचे प्रकरण चर्चेत असताना रत्नागिरी शहर पोलीस आणि एटीएस यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथून एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेली बांगलादेशी महिला गेली ४ ते ५ वर्षे रत्नागिरीत वास्तव्याला होती. रत्नागिरीत घरकाम करण्याचा तिचा व्यवसाय होता तर तिच्या पतीचे दुकान आहे.