–शिक्षण विस्तार अधिकारी संघटना निर्णय
-शिक्षणाधिकाऱ्याना निवेदन, प्रलंबित मांगण्याकडे वेधले लक्ष
संदीप घाग / सावर्डे
राज्यातील शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजअहमद देसाई, सािाव संदेश कडव, श्रीधर शिगवण, मानसी शिंदे, भाग्यश्री हिरवे, सरोज आखाडे, शशिकांत त्रिभुवणे आदींनी शिक्षणाधिकारी बी. एम. कुंभार यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संघटनेच्या मागण्या योग्य असून त्यात मार्गी लावाव्यात, असे निर्देश दिले होते. मात्र शालेय शिक्षण विभागाकडून या मागण्यांबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण विस्तार अधिकारीपद शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग करून सामान्य राज्यसेवा गट अ राजपत्रित सेवांमध्ये समाविष्ट करावे, शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखाचे सेवा प्रवेश नियम 28 डिसेंबर 2022मध्ये बदल करून शिक्षण सेवा गट व बहुप्रशासन शाखाचे पदोन्नतीचे प्रमाण 80 टक्के करून त्यामध्ये शिक्षण विस्ताराधिकारी सवर्गास 50 टक्के कोटा निश्चित करावा, वेतनासोबत 8,000 रूपये प्रवास भत्ता मिळावा, उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या पदोन्नतीची सेवाज्येष्ठता यादी तत्काळ अंतिम करावी, श्रेणीतील या पदावर पदोन्नती झालेल्या विस्ताराधिकाऱ्याना एक वेतनवाढ मिळावी, अशा मागण्या प्रलंबित आहेत. त्या मान्य न झाल्यास परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दहावी, बारावी परीक्षा कामकाजावर बहिष्कार
