मनसे कार्यकर्त्यांचा दणका
रत्नागिरी : येथील एका मॉलमध्ये परप्रांतीय अधिकाऱ्याकडून रत्नागिरीतील एका मराठी ग्राहकाला अपमानास्पद वागणूक दिली. तसेच मनसे व इतर राजकीय पक्षाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. त्या अधिकाऱ्याला आज मनसेचे रत्नागिरी जालुकाध्यक्ष रूपेश जाधव आणि मनविसे जिल्हाध्यक्ष गुरूप्रसाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयात जाऊन मनसे स्टाईलने दणका दिला. त्यानंतर वठणीवर आलेल्या या अधिकाऱ्याने माफी मागितली.
रत्नागिरी शहरातील एका मॉलमधील एका परप्रांतीय अधिकाऱ्याने मराठी ग्राहकाशी हुन्जत घातली. त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. तुझे जो करना है वो कर, मनसेको बोलो, शिवसेनाको बोलो, या किसीको भी बोलो, अशी भाषा वापरली. त्या अधिकाऱ्याच्या दादागिरीबाबत संबंधित ग्राहकाने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. मनसेचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव आणि मनविसे जिल्हाध्यक्ष गुरूप्रसाद चव्हाण आणि कार्यकर्ते मॉलमध्ये धडकले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला बोलावून घेत मनसे स्टाईलने दणका दिला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित मुजोर कर्मचाऱ्यावर २४ तासात कारवाई करून माफीनामा देण्याचे कबूल केले. या परप्रांतीय अधिकाऱ्याने मनसेची जाहीर माफी मागितली. यापुढे रत्नागिरीत कोणत्याही परप्रांतीयांची मुजोरी मनसे खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.