चिपळूण : गुहागर- विजापूर मार्गावर शहरातील चिंचनाका – येथे वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दोन वाहनांवर येथील वाहतूक विभागाच्या पोलिसांनी बुधवारी (ता. १५) दुपारी १२.३० वाजता कारवाई केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजीव रामचंद्र चव्हाण (४२, रा. दोणवली, चिपळूण), सुधीर रामचंद्र मते (४८, तळवली, गुहागर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याची फिर्याद पोलिस हेडकॉन्स्टेबल अशोक पवार यांनी दिली आहे. यातील राजीव चव्हाण याने त्याच्या मॅझिक गाडी गुहागर- विजापूर मार्गावर चिंचनाका येथे वाहनांना अडथळा व सार्वजनिक रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना धोका होईल, अशा स्थितीत लावली होती. तसेच सुधीर मते यांनीही मॅक्झिमो गाडी गुहागर-विजापूर मार्गावरील चिंचनाका येथे इतर वाहनांना अडथळा ठरेल अशा स्थितीत उभी केली होती. त्यामुळे या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.