मुंबई:-बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हल्ल्यानंतर सैफला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हा हल्ला नेमका का झाला आणि त्यामागील कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे आणि हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.