उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सकारात्मक चर्चा
चिपळूण:-सावर्डे गावातून राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा हायवे झाला आहे.त्यामुळे प्रवाशी लोकांची सुविधा होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून सावर्डे येथे सुसज्य असे एस टी स्टँड उभारणी करिता चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदासंघाचे आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतला आहे.
या करीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( एम.आय. डी. सी ) फंडातून 1 कोटी निधी मिळावा या करीता मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योमंत्री मा श्री उदय सामंत यांची भेट घेऊन निधीची मागणी केली.
तसेच सकारात्मक चर्चा केली असता उद्योग मंत्री मा श्री उदय सामंत साहेब यांनी सावर्डे एस टी स्टँड उभारणी करीता 1 कोटी निधी देण्याचे मान्य केले, आणि तसेच पुढील कार्यवाही करण्यासाठी, आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.)अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. या वेळी सावर्डे ग्रामपंचायतचे उपसरपंच जमीर मुल्लाजी ही उपस्थित होते.