खेड:-विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी एका तरुणास अटक केली. बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात असल्याचे समजते. या बाबतचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
घाटमाथ्यावरून येथे आलेल्या एका विवाहित तरुणीशी एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाचे प्रेमसंबंध जुळले होते. यातून तरूणाने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार विवाहित तरुणीने येथील पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी तरुणास अटक केली आहे. या तरुणावर यापूर्वीही अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्याने विवाहित तरुणीशी संबंध ठेवत अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.