रत्नागिरी : रस्ते सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून रत्नागिरीत 16 जानेवारी रोजी हेम्लेट जनजागृती रॅली व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आह़े. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गणेशनगर कुवारबांव येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे. तसेच सकाळी 9 वा. रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती रत्नागिरीचे सदस्य सचिव व कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, जिल्हा शल्य चिकित्सक ड़ॉ. भास्कर जगताप, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, वाहतूक पोलीस निरीक्षक आबासो पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर आदी उपस्थित राहणार आहेत.