सचिन मोहिते / देवरुख:-संगमेश्वर तालुक्यातील चाफवली धनगरवाडीमध्ये बिबटयाने धुमाकुळ घातला आहे. बिबटयाने गोठयात शिरून येथील शेतकरी संतोष बोडेकर यांच्या शेळीला ठार केल्याची घटना घडली आहे. बिबटयाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
दुर्गम भागात चाफवली धनगरवाडी वसलेली आहे. येथील ग्रामस्थ शेती बरोबर शेळी पालन, कुक्कुटपालन करून कुटुंबाचा गाडा हाकतात. मात्र गेली 15 दिवस भर वस्तीत बिबटयाचा वावर वाढला आहे. सोमवारी संतोष बोडेकर यांच्या शेळीवर बिबटयाने हल्ला करत ठार केली. गतवर्षी बोडेकर यांया दोन शेळया बिबटयाने ठार केल्या होत्या.