संदीप घाग / सावर्डे
वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. आयोजित कृषी महोत्सवात पशुधन स्पर्धा तसेच पाककला स्पर्धेतील विजेत्यांना प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, मुख्याधिकारी विशाल भोसले, उपविभागिय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे,उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन डॉ. दत्तात्रय सोनावले, कृषी अधिकारी दापोली कृषी विद्यापीठ संजय क्षीरसागर, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिताताई चव्हाण, तज्ञ संचालिका ऍड. नयना पवार वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल स्पर्धकांनी व विजेत्यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला धन्यवाद दिले आहेत.
वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी महोत्सवात कृषिविषयक स्टॉल्स तसेच महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी खाद्यपदार्थ तसेच बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी मोफत स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले. याबद्दल बचत गटांच्या महिला प्रतिनिधींनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला धन्यवाद देत आम्हाला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल या महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच कृषी प्रदर्शनामध्ये ५ ते ९ या तारखे दरम्यान बैलगाडा शर्यतीमधील बैल सुद्धा प्रदर्शनासाठी आणले होते त्यामध्ये ५ तारखेला सर्जा बैल,६ तारखेला बैलगाडी शर्यतीमध्ये देव म्हटला जाणारा बकासुर (सरपंच)बैल, ७ तारखेला भारत आणि बन्सी बैल, ८ तारखेला सुंदर बैल आणि ९ तारखेला महिब्या बैल असे अनेक प्रकारचे बैल बाहेरून प्रदर्शनला आले होते.
तसेच या कृषी महोत्सवात ‘सेलिब्रिटी इव्हिनिंग’, ‘मराठी बाणा’, ‘मी मराठी’, असे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमांना कोकणवासीयांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. याचबरोबर या महोत्सवात पशुधन व पाकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेतील विजेत्यांना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यामध्ये सुदृढ निरोगी सुंदर गाय वासरू स्पर्धेत इब्राहिम पटाईत, दिलीप माटे (कामथे), कल्पेश शिंदे (शिरगाव), सुदृढ निरोगी सुंदर म्हैस वासरू गटातील स्पर्धेत विक्रांत भोसले (तिसंगी, ता. खेड), जयेश शिंदे (मुरडव -संगमेश्वर), आशिष सुर्वे(नवीन कोळकेवाडी), सुदृढ निरोगी सुंदर गाय स्पर्धेत वैभव बाईत (कुंभार्ली), अनंत साबळे (कोंढे- चिपळूण), प्रितेश यादव (तिडे-मंडणगड), सुदृढ निरोगी सुंदर म्हैस स्पर्धेत सम्यक कांबळे, (खेंड -बावशेवाडी चिपळूण ), अनिकेत महाडिक (केळणे, ता. खेड), राजेश जोगळे ( दळवटणे- चिपळूण), सुदृढ निरोगी सुंदर रेडा स्पर्धेत आशिष सुर्वे ( नवीन कोळकेवाडी), रुपेश शिंदे ( मुरडव -संगमेश्वर), हेमंत शिंदे ( मुरडव- संगमेश्वर), सुदृढ निरोगी सुंदर बैल स्पर्धेत तेजस सचिन सावंत ( तिसंगी- खेड), सुरेश राणे (कोळकेवाडी-चिपळूण), पार्थ जाधव ( गाणे- चिपळूण), जास्त दूध देणारी गाय स्पर्धेत रवींद्र पांचाळ पालवन राकेश राजेंद्र पांचाळ व राकेश पांचाळ (पालवण), कोकण कपिला स्पर्धेत मंगेश पालशेतकर ( कोंढे दापोली) अनिकेत बापट व प्रबोध बापट (वहाळ-चिपळूण), डॉग शो स्पर्धेत रणजीत पुजारी (कर्नाटक), विजय पाटील (लोटे-खेड), सुनील गौराजे (राधाकृष्ण नगर- चिपळूण ), निखिल मांडवकर (कोकरे), अनिकेत सोनावणे (मल्हारपेठ), कॅट शो स्पर्धेत स्नेहल आगरे ओवी गुडेकर (चिपळूण), इरफान कादरी (पेठमाप- चिपळूण) पाककला स्पर्धा गोड पदार्थ या गटात गौतमी धारिया (कावीळतळी),-सरिता भुतिया ( चिपळूण), नम्रता डाकवे ( चिपळूण ), सविता शिरोळे ( चिपळूण ), स्वप्ना कुलकर्णी (चिपळूण ), पाककला स्पर्धा तिखट पदार्थ या गटात तनवी शिंदे, किशोरी घोलप, विना भोसले, स्वप्ना कुलकर्णी, नम्रता डाकवे, शिल्पा भावे, कृषी महोत्सव २०२५ गिफ्ट हॅम्पर विजेते प्रथम क्रमांक सार्थक शिंदे, द्वितीय क्रमांक सोहम म्हादे, तृतीय क्रमांक सीमा पाटणे असे या स्पर्धेतील विजेते आहेत.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, मुख्याधिकारी विशाल भोसले , उपविभागिय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन डॉ.दत्तात्रय सोनावले, कृषी अधिकारी दापोली कृषी विद्यापीठ संजय क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने व मुख्याधिकारी चिपळूण नगरपालिका आकाश लिगाडे यांनी वाशिष्ठी डेअरीच्या कृषी महोत्सवाचे भरभरून कौतुक करताना कृषी महोत्सवामुळे कोकणातील शेतकऱ्यांमध्ये आमूलाग्र बदल होईल, असा विश्वास व्यक्त केला. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.