गुहागरः लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर यांच्यावतीने गुहागर किनारा युवा महोत्सव २०२५ साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत जिल्हास्तरीय भव्य ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन रंगमंदिर गुहागर येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक १७ जानेवारीपर्यंत शुभम भायनाक, शुभम शेटे, अभिषेक भोसले, पुष्कर शिंदे यांच्याकडे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहिल आरेकर यांनी केले आहे.