दापोली : तालुक्यातील नवानगर येथील संतोष सुरेश देवकर (36) याने टाळसुरे स्मशानभूमीत आत्महत्या केल्याची घटना 14 जानेवारी रोजी उघडकीस आली.
याबाबतची फिर्याद त्याचा भाऊ परशुराम देवकर यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार संतोष हा 13 जानेवारी रोजी सकाळी 10ः30 वाजता घरातून कोणालाही न सांगता निघून गेला. संध्याकाळपर्यंत परत आला नाही म्हणून शोध घेण्यात आला. तसेच 14 रोजी पुन्हा आजूबाजूच्या जंगलात व इतर परिसरात शोध घेत असताना सकाळी 10ः30 वाजताच्या सुमारास टाळसुरे स्मशानभूमी येथे एका दोरीने झाडाच्या फांदीला आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळून आला. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याबाबत दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार गायकवाड करीत आहेत.