चिपळूण : तालुक्यातील तिवरे- रोहिदासवाडी येथे
घरात भानगड चालू आहे ती वाकून पाहिले म्हणून वृद्धाला मारहाण केल्याची घटना चिपळुणात घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक दीपक गायकवाड (तिवरे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद नारायण गोविंद कदम (85, तिवरे) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास नारायण कदम हे वाटेने जात असताना त्या वाटेत अभिषेक गायकवाड याचे घर आहे. गायकवाड हा त्याच्या घरात बडबड करत होता. म्हणून कदम यांनी थांबून पहिले असता त्या गोष्टीचा राग गायकवाड याला आला व त्याने काठीने कदम यांना मारहाण केली. यात ते जखमी झाले. या मारहाणप्रकरणी कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.