खेड : तालुक्यातील मूळगाव येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांया नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून एकास रंगेहाथ पकडले. या धाडीत 1,500 रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. सुनील सोनू जागडे (39, कर्जी-देऊळवाडी) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पवार यांनी तक्रार नोंदवली.