रत्नागिरी मेर्वी येथील घटना
रत्नागिरी : तालुक्यातील मेर्वी येथे महिलेला पती व सासऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना 11 जानेवारी रोजी सकाळी 8 च्या सुमारास घडल़ी. सुजाता प्रकाश भाताडे (40, ऱा मेर्वी महादयेवाडी) असे या महिलेचे नाव आह़े. सुजाता यांनी मारहाण प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी महिलेचा पती व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा.
सुजाता व त्यांचे पती प्रकाश भाताडे हे 2008 सालापासून विभक्त आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, सुजाता यांना 5 हजार रुपये पोटगीही देण्यात येत़े 11 जानेवारी रोजी सकाळी सुजाता या आपल्या मुलीशी बोलत होत्य़ा. या गोष्टीचा राग आल्याने मुलीसोबत तु बोलायचे नाही, असे पती प्रकाश भाताडे व सासरे कृष्णा भाताडे हे त्या महिलेला सांगू लागल़े. यावेळी झालेल्या वादातून प्रकाश व कृष्णा भाताडे यांनी महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण केली, अशी तक्रार पूर्णगड पोलिसात दाखल करण्यात आल़ी.