चिपळूण:-भरधाव वेगातील दुचाकीने एका कारला धडक दिल्याची घटना काही दिवसांपूर्वी शहर बाजारपेठेतील गांधीचौक येथे घडली. या प्रकरणी सोमवारी दुचाकीस्वारावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात कारचे नुकसान झाले. सुरज अरविंद पवार (22, मिरजोळी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद विनोद सहदेव आंबेरकर (45, चिपळूण पोलीस ठाणे) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 रोजी 10.50 च्या सुमारास अपघाती खबर देणार रोशन रवींद्र चव्हाण (33, पुणे-सध्या भोम) हे त्यांच्या ताब्यातील कारने बहादूरशेख नाका ते भोम असे जात होते. ते चिपळूण शहर बाजारपेठेतील गांधीचौक येथे आले असता इंडिकेटर देवून डाव्या बाजूला जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार रोशन चव्हाण हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवर अन्य दोघांना बसवून जाताना त्याने दुचाकी भरधाव वेगात चालवून कारला धडक दिली. यात कारचे नुकसान झाले. या अपघातप्रकरणी रोशनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.