मिलिंद कडवईकर/कडवई :-कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट सुयश संपादन केले.
इंटरमिजिएट परीक्षेत आदर्शा मोहिते हिला ए ग्रेड,रुद्र मिरगलला बी ग्रेड तर चैतन्य राणे,ओमकार धामणाक,अनघा सावंत,पार्थ भुवड,वैष्णवी कडवईकर,आदित्य कानाल यांना सी ग्रेड प्राप्त झाली.
एलिमेंटरी परीक्षेत देवान किंजळकर,गौरव गुरव, कर्णिका मेस्त्री यांना ए ग्रेड,नीरजा बोबले,ऋषाली जोगले, दुर्वेश मेस्त्री, साईराज सडकर यांना बी ग्रेड तर उमेश जांगली,आयुष ओकटे,संपदा ओकटे व संग्राम ओकटे यांनी सी ग्रेड प्राप्त केली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सोमनाथ कोष्टी यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत यळगुडकर,सचिव वसंत उजगावकर,मुख्याध्यापक शेषेराव अवघडे व पर्यवेक्षक संतोष साळुंके यांनी अभिनंदन केले आहे.