रॉयल चेस अकॅडमीतर्फे आयोजन
राजापूर : राजापूर रॉयल चेस अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजापूर तालुका मर्यादित “रवींद्रनाथ साळवी स्मृती चषक” या बुद्धिबळ स्पर्धेत राजापूर येथील शुभम आनंद बावधनकर याने खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.
शहरातील एम. एस. क्लासेस राजापूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेचा शुभारंभ बुद्धिबळ प्रशिक्षक श्री राजेंद्र साळवी यांच्या हस्ते करण्यात आला. ही स्पर्धा स्विस लिग पद्धतीने खेळवण्यात आली. स्पर्धेचा उपविजेता गुरुप्रसाद राजेंद्र साळवी ठरला. सुजित जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यश प्रकाश कातकर यांने चतुर्थ तसेच चिराग समीर प्रभूदेसाई याने पाचवा क्रमांक पटकावला.
महिला गटात प्रथम क्रमांक प्रज्ञा साळवी व द्वितीय क्रमांक मृणाल विकास कुंभार हिने मिळवले.
या स्पर्धेतील वयोगटानुसार विजेते खालील प्रमाणे.
वयोगट १३ वर्षे मुलगे
१. प्रसाद प्रमोद गाडगीळ
२. मानवीक सुशांत मराठे
वयोगट १३ वर्षे मुली
१. उमा अमृत तांबडे
२. समृद्धी वालेकर
वयोगट ११ वर्षे मुलगे
१. निल दिनेश कुडाळी
२. मयंक अमोल बोटले
वयोगट ११ वर्षे मुली
१. ईश्वरी सप्रे
वयोगट ९ वर्षे मुलगे
१. हेमांग प्रशांत मराठे
२. चिन्मय बाकाळकर
श्री प्रशांत मराठे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण राजेंद्र साळवी, अमृत तांबडे, प्रवीण बोटले यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेला कोंढेतड राजापूर येथील महिला गृह उद्योग “सिद्धिविनायक पापड” यांचे मालक राजेंद्र साळवी यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचे नियोजन श्री मोहसीन सय्यद यांनी पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजापूर रॉयल चेस अकॅडमी (८९८३१२८२२८) मोहसीन सय्यद, राजेंद्र साळवी आणि अमृत तांबडे यांनी मेहनत घेतली.