रत्नागिरी:-येथील अनबॉक्स युवर डिझायर आणि पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये येत्या २६ जानेवारी रोजी ई यंत्रण या उपक्रमाच्या अंतर्गत मेगा ड्राइव्ह होणार आहे.
आपणही समाजाचे काही देणे लागतो हे लक्षात घेऊन गेल्या काही महिन्यांपासून अनबॉक्स युअर डिझायर ‘प्लास्टिक कचरा संकलन’ आणि ‘जुने कपडे संकलन’ हे सामाजिक उपक्रम राबवत आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी अनबॉक्स युअर डिझायरकडून प्लास्टिक कचरा आणि जुने कपडे संकलन केले जाते व ते रिसायकलिंगला दिले जाते. त्याचप्रमाणे अनबॉक्स युअर डिझायरतर्फे २६ जानेवारी व त्यानंतरदेखील प्लास्टिक कचऱ्यासोबत ई-कचऱ्याचे देखील संकलन केले जाणार आहे.
पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन ही संस्था गेली १० वर्षे पर्यावरण विषयात पुण्यात काम करत आहे. ‘कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि जास्तीत जास्त लोक सहभागातून शाश्वत विकास’ या मूलभूत गोष्टीवर पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन काम करते. जुन्या कपड्यांपासून नवीन उत्पादने बनवणे आणि त्याची विक्री व्यवस्था. याला ‘परिपूर्णम’ असे नाव दिले आहे. ई-वेस्ट म्हणजेच सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल वस्तू ज्या आपल्याला आता नको आहेत, त्या गोळा करून त्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी दान करण्याची व्यवस्था ई-यंत्रण या उपक्रमातून गेली जाते. ग्रीन कन्सल्टन्सी या उपक्रमांतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि कम्पोस्टिंग करून दिले जाते.
ई यंत्रण या उपक्रमाच्याअंतर्गत पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि अनबॉक्स युअर डिझायर यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये २६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ई- वेस्ट कलेक्शन करण्यात येणार आहे. त्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे ई-वेस्ट योग्य ठिकाणी रिसायकलिंगसाठी देता येईल आणि त्यापासून होणारे पर्यावरण प्रदूषण रोखता येईल.
ई-कचऱ्यामध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन, प्रिंटर, कॉम्प्युटर, माऊस, फॅन्स, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह, पेनड्राइव्ह, टीव्ही, डिजिटल कॅमेरा, एसी, व्हिडीओ कॅमेरा, सीडी / डीव्हीडी प्लेयर, मोबाइल फोन, होम थेटर्स, चार्जर्स, हेडफोन्स आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स वर्किंग ऑर नॉन वर्किंग आणि डिस्पोझेबल वस्तूंचा समावेश आहे. ई-कचऱ्यामध्ये फ्लोरोसंट ट्यूबलाइट्स, इनकॅन्डेसन्ट बल्ब्स, सीएफएल्सचा समावेश नाही.
रत्नागिरीतील संकलन केंद्रावर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ई- कचरा गोळा करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी २६ जानेवारी रोजी आपल्या जवळच्या केंद्रावर आपल्याकडील ई-कचरा नेऊन द्यावा, अशी विनंती पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि अनबॉक्स युअर डिझायरतर्फे करण्यात आले आहे.
‘ई-यंत्रण’ या ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियानाची रत्नागिरीतील संकलन केंद्रे अशी – अनबॉक्स युअर डिझायर – 8767461499 – नाचणे-साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी. आगाशे फूडकोर्ट – 9209414199 – संभाजीनगर. सावंत रोडलाइन्स – 9423297470 – साळवी स्टॉप. धन्वंतरी मेडिकल्स – 9665055654 – मारुती मंदिर. अभिजित करंबेळकर – 9421079654 – शांतीनगर. सुवर्णसूर्य फाउंडेशन – 9699777121 – शेरे नाका. मानस किराणा स्टोअर – 9011662220 – माळ नाका. डी. के. जोशी सन्स – 9422052613 – जिल्हा परिषद कार्यालयाजवळ. आर्यक सोल्युशन्स – 9420907533 – रमेशनगर. अनिकेत कोनकर – 9423292162 – खेडशी. हॉटेल सी फॅन्स – 9822290859 – मांडवी. हर्ष दुडे – 9604214101 – कारवांची वाडी. खादाडी कट्टा – 8668201414 – जोशी पाळंद. चिट चॅट क्लब – 7387066767 – थिबा पॉइंट.
‘ई-यंत्रण’ ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियानांतर्गत सहभागी होणारे स्वयंसेवक असे – गौरांग आगाशे – 9730310799, चिन्मय भागवत – 8888798845, गुरुप्रसाद जोशी – 9552546468, रत्नाकर जोशी – 9422052613, महेंद्र दांडेकर – 7410104433, शरदचंद्र वझे – 9822978033, ऋषिकेश सरपोतदार – 9405338354, नेहा गोखले – 9359863349, आशीष पाटील – 8552032533, अमेय मुळ्ये – 9404330003, विशाल पवार – 9172068619, भाग्यश्री सुर्वे – 7249822776.