मुंबई:-राज्यात ढगाळ हवामान झाल्याने गारठा कमी झाला आहे.पुढील काही दिवस धुके आणि ढगाळ हवामान राहणार आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान थंडी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवस किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. श्रीलंका आणि भारत दरम्यान असलेल्या कोमोरिन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर भारतात १०० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत.उत्तर भारतात पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वेगाने येत आहेत. त्यामुळे थंडी कमी-अधिक होत असून, दाट धुक्याचे साम्राज्य कायम आहे.सध्या राज्यातील तापमानाचा पारा १० अंशांच्याही पुढे गेला आहे. दोन- तीन दिवसांमध्ये राज्यातील गारठा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.गेले काही राज्याच्या बऱ्याच भागात सकाळी उशिरापर्यंत धुके पाहायला मिळत आहे. ढगाळ हवामान झाल्याने गारठा कमी झाला आहे. सोमवारी (ता. १३) धुळे ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उर्वरित राज्यात किमान तापमान १३ अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यात सोमवारी मालेगावात सर्वांत कमी १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.पुण्यात १७.१ अंशांवर तापमान होते, तरी पुणेकरांना बोचरी थंडी जाणवत होती.सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंच्या २४ तासांत सोलापूर येथे ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान आज, मंगळवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र उद्यापासून (ता. १५) तीन दिवस किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.राज्यातील थंडी पुन्हा वाढायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.