चिपळूण : शहरातील बहादुरशेख नाका येथील चौकात मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर ग्रामस्थांनी धाव घेत रास्ता रोको केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, आयशर टेम्पो खेडच्या दिशेने वेगाने जात होता. बहादुरशेख नाक्यातील चौकात आयशर टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
दुचाकी चालकाची परिस्थिती गंभीर आहे. ट्रकच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने दुचाकीला धडक दिली. चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातातील जखमीची ओळख अद्यापही पटलेली नाही.