रत्नागिरी:-मुंबई-गोवा महामार्गावरील बाबनदी येथे डंपरने एसटी बस आणि उभ्या बोलेरा गाडीला धडक दिल्याने विचित्र अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी नसले तरी तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
सविस्तर वृत्त असे की, बावनदी येथे प्रवाशांना घेण्यासाठी बस थांबली होती. याचवेळी संगमेश्वरहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या डंपर चालकाला डंपरवर ताबा मिळवता न आल्याने डंपर रस्याबाहेर काढण्याच्या नादात बसला धडक दिली. याचवेळी मात्र रस्त्याबाहेर उभ्या असलेल्या बोलेरो गाडीलाही धडक बसल्याने तीन वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे तीन वाहनांचे नुकसान झाले.