मुंबई/उदय दणदणे:-नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र अखंड-भारत (मध्यवर्ती मुंबई) संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र मटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील नवनिर्वाचित आमदार किरण (भैया) सांमत यांची सोमवार दिनांक १३जानेवारी २०२५ रोजी नरीमनपॉइंट,मुंबई येथे शुभेच्छा भेट आणि नमन लोककला व लोककलावंतांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
भेटी दरम्यान संस्थेच्या एकूण कार्याचा अहवाल ध्येय,धोरणे आणि उद्दिष्टे याबाबत चर्चा करण्यात आली. त्याच बरोबर आगामी काळात अपेक्षित असणाऱ्या ” नमन लोककला महोत्सवाच्या” आयोजना संदर्भात देखील मांडणी करून एक निवेदन संस्थेच्या वतीने सादर करण्यात आले.
सदर निवेदना बाबत आमदार किरण (भैया) सांमत सकारात्मक असल्याचे अध्यक्ष रवींद्र मटकर यांनी सांगितले. दरम्यान शिवसेना राजापूर- लांजा-साखरपा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख विश्वास राघव यांच्याशी देखील सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे संस्थेचे महासचिव शाहिद खेरटकर यांनी अधिक माहिती देताना सांगितली, सदरच्या भेटीत दोन्ही मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.संस्थेच्या वतीने अध्यक्ष रवींद्र मटकर, सहसचिव सुधाकर मास्कर,उपाध्यक्ष रमाकांत जावळे,सहसचिव शाहीर तुषार पंदेरे,प्रसिध्दी प्रमुख उदय दणदणे, खजिनदार सतीशजी जोशी,सदस्य/ प्रसिध्दी प्रमुख उदय दणदणे, कुणबी बँक संचालक संतोष चौगुले,चंद्रकांत धोपट, शाहीर चंद्रकांत साळवी, सदस्य: संदीप कानसे, सुभाष बांबरकर,प्रशांत भेकरे,अमित काताळे,रामचंद्र बाईंग,सुरेश मांडवकर,राजाराम फाफे,संतोष पळसमकर,हरेश बापर्डेकर,आदी संस्थेचे पदाधिकारी आणि लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते,