सावर्डे:-प्रतिवर्षीप्रमाणे वर्ष 2024 – 25 या वर्षांमध्ये सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावर्डे येथील इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यानिमित्ताने शिवरायांचे जीवन चरित्र ही थीम घेऊन विद्यार्थ्यांनी शिवराय व शिवरायांच्या मावळ्यांवर आधारित कलाकृती सादर केल्या.त्या अंतर्गत गोंधळ, पोवाडा, शिवस्तुती ,शिवगर्जना, राजमुद्रा अशा विविध कला प्रकारांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूण तालुक्याचे विस्तार अधिकारी श्री. राजअहमद देसाई सर हे लाभले होते.त्याचबरोबर कार्यक्रमासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. शेखरजी निकम सर आमदार चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ, सचिव श्री. महेश महाडिक सर त्याचबरोबर विश्वस्त चंद्रकांत सुर्वे सर शालेय समिती अध्यक्ष व विश्वस्त श्री. शांताराम खानविलकर सर तसेच शालेय समिती सदस्या सौ. पूजा निकम मॅडम, रावसाहेब सुर्वे सर, प्रसिध्द उद्योजक श्री.प्रशांत निकम सर, सरपंच सौ. समीक्षा बागवे,श्री.शौकत माखजनकर तसेच सर्व शालेय समिती व सांस्कृतिक समिती सदस्य तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे प्रमुख, सावर्डे गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जीवनदीप प्रकाशन,नवनीत प्रकाशन व इयत्ता दहावी चे विद्यार्थी यांस कडून ब्ल्यू टूथ स्पीकर, ऑफिस चेअर सेट व एक्वागार्ड शाळेला भेट म्हणून देण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलनामधे विविध स्पर्धा व स्पर्धापरीक्षामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ यास्मिन शेख व सौ वैशाली कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केले.
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी सर्व शिक्षक पालक तसेच सन्माननीय श्री आडनाईक सर श्री घाडगे सर व श्री वीरकर सर त्याचबरोबर श्री लोंढे श्री संदेश वारे सर या सर्वांचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीरा जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रमुख श्री अजित मोहिते व सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला.