प्रसिद्ध कव्वाल तौसिफ जुनेदी यांची होणार कव्वाली
संगमेश्वर/मुझम्मील काझी:- तालुक्यातील प्रसिद्ध आंबेड बुद्रुक येथील हजरत पिर इस्माईल शहा बाबा कादरी ( रहमतुल्ला अलैही) यांचा उरुसानिमित्त तीन दिवसीय भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हजरत पिर इस्माईल शहा बाबा कादरी ( रहमतुल्ला अलैही) यांचा उरूस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या उरुसनिमित बुधवार दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता गुस्ल व चुना तसेच रात्री यंग बोईज आंबेड बु. ग्यारवी शरीफ व रातीब यांची ग्यारवी शरीफ होणार आहे.
गुरुवार दिनांक १६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता संदल मिरवणूक,रात्री १० वाजता संदल चढवणे, आणि रात्री ११ वाजता प्रसिद्ध कव्वाल तौसिफ जुनेदी यांची कव्वाली होणार आहे.
शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता ढोल ताशा बाजा,रात्री १० वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध एस.एम.नजराणा डफ पार्टी राजापूर यांची रातिब व मुरीदी होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हजरत पिर इस्माईल शहा बाबा कादरी ( रहमतुल्ला अलैही) यांचा उरूस हिंदू मुस्लिम एकता मोठ्या आनंदात साजरा करणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जमातुल मुस्लिमीन आंबेड बुद्रुक उर्स कमिटी व यंग बॉईज महफिल ग्यारवी रातीब आंबेड बु. यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण DKB Indian (https://youtube.com/@dkbindian?si=R4vpxvWDtNYl7XsV) या यूट्यूब चॅनलवर दाखवण्यात येणार आहे.