चिपळूण/संदीप घाग:-साधारपणे कोकणात शेतकरी केवळ भट शेतीवरच भर देतात. जमिनीचाच पोषकता, माकडे आणि गुरांचा त्रास आणि आणीत वृष्टी किंवा अति उन्हाळा यामुळे पाले भाजाय, फळ भाज्या पिकवणे जिकिरीचे असते म्हणून कोकणामध्ये साधारण पणे ह्या गोष्टी आयात केल्या जातात. पण कोकणातील गर्द झाडांनी नटलेल्या डोंगर दऱ्यां,पावसाळ्यात उपलभ असलेले विपुल पाणी आणि शेण खात ,गांडूळ खत यांचा योग्य वापर करून जर सुरक्षित शेताची करता अली तर असा विचार करून वालावलकर रुग्णालयाने आई आई टी मुंबई शी संधान बांधून बांबूपासून पॉलीहाऊस म्हणजे फळ भाज्या, वेली भाज्यांसाठी एक सुरक्षित बांबूचे घर अशी कल्पना करून बांबू पोळू हाऊसेस बांधली आहेत.
कोकणात विपुल प्रमाणात बांबू प्रत्येक शेतकऱ्याकडे बांधावर किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या जवळ उपलब्ध आहेत. त्यांचाच वापर करून बांबूचे पॉली हाऊस उभे केले आहे. त्याचा आकार अगदी आटोपशीर असल्यामुळे वापरण्यास अतिशय सुलभ. या पॉलिहाऊसच्या चारही बाजूने हवा येण्या जाण्यासाठी म्हणजेच हवा खेळती राहण्यासाठी शेडनेट लावली आहे. आपल्या मर्जीनुसार किंवा आतल्या पिकांच्या गरजेनुसार आपण हे शेडनेटचे जागा पूर्ण बंद करू शकतो किंवा अर्धवट उघडी पण ठेवू शकतो. त्याचबरोबर पाण्यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था केली की अगदी मर्यादित पाणी ज्यावेळी आपल्याला पाणी कमी उपलब्ध असणार आहे त्यावेळी देता येईल. पावसाळ्यात तर पाणी देण्याची ही गरज पडत नाही. पावसाळ्यामध्ये कोकणात पालेभाज्या शेतामध्ये करता येत नाहीत.पण या बांबूच्या पॉलिहाऊस मध्ये कोथिंबीर, पालक, माठ अशा पालेभाज्या उत्तम रीतीने आपण उत्पादित करू शकतो.
वैशिष्ट्य असं की या पॉलीहाऊस मधून निघणारा पालेभाज्या इतक्या कोवळ्या आणि लुसलुशीत असतात की त्याच्या देठांची सुद्धा भाजी खावीशी वाटते. याशिवाय आम्ही या पॉलिहाऊस मध्ये झेंडू लावला आणि असं निरीक्षण आहे की वर्षभर आपल्याला यामधून झेंडूची फुले मिळू शकतात.
हे पॉलिहाऊस वापरत आणून फक्त सहाच महिने झाले. आता हिवाळी हंगामात आणि उन्हाळी हंगामात सुद्धा काय काय त्यात करता येईल याविषयीचे प्रयोग सुरु आहोत. निश्चितच हे असे छोटेसे बांबूपासून केलेले पॉलिहाऊस कोकणातल्या छोट्या शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे.आणि पालेभाज्या आणि फळ भाज्या त्यांना आपल्या अंगणातच पिकवता येणार आहेत आणि त्या निमित्ताने सर्वांचे आरोग्य सुधृढ राहण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे ह्या पॉलीहाऊस तंत्रज्ञान आणि येणार खर्च हा आई आई टी मुंबई ने उचलला आहे.