राजापूर:- तालुक्यातील विखारेगोठणे येथे शेकोटी घेत असताना वृद्धा ३५ टक्के भाजून जखमी झाली. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जयवंती दानू काळे (वय ६०, रा. विखारे गोठणे, राजापूर) असे भाजून जखमी झालेल्या नाव आहे.
सोमवारी सकाळी त्या घराशेजारील पातेरा गोळा करून शेकोटी घेत होत्या. त्या वेळी वाऱ्याने त्यातील किटाळ उडून त्यांच्या अंगावरील साडीने पेट घेतला. ही बाब त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना प्रथम राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेऊन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.