विठ्ठलराव जोशी ट्रस्टनेने उचलला खर्च
सावर्डे / संदीप घाग:-वालावलकर रुग्णालय व टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने कोकण विभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी कॅन्सर(स्क्रीनिंग) सर्वेक्षण 2005 ते 2013 साली राबवण्यात आले . ह्या सर्वेक्षणातून कोकण विभागात मुखाच्या कॅन्सर हा सर्वात जास्त प्रमाणात आढळून आला. त्याचे कारण अभ्यासाअंती असे निर्दशनास आले की तंबाखूचा वापर हा मिश्रीच्या , गुटखा स्वरूपात , चघळण्यासाठी होत आहे, तसेच तंबाखूच्या जोडीला तोंडाचे आरोग्य अस्वछ इतद्यादी कारणे लक्षात आली. ह्या सर्व दुष्परिणामामुळे भविष्यात मुखाचा कॅन्सर ही गंभीर समस्या होणार आहे. त्याचा जनमाणसातील आरोग्यावर सामाजिक, आर्थिक, मानसिक परिणाम होणार आहे असे वालावालकर रुग्णालयाच्या लक्षात आले. यावर उपाय म्हणून शाळेतील मुले म्हणजे भावी पिढीचे आयुष्य उत्तम जावे यासाठी शालोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. यासाठी मुलांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
भविष्यातील येऊ पाहणाऱ्या ह्या भयंकर परिणामांतर आत्ताच योग्य वेळी प्रतिबंधनात्मक उपक्रम जर का आखला गेला नाही तर ही एक मोठी आरोग्य समस्या ठरू शकते . ह्या समस्यांवर सर्वांगीण उपाय म्हणून वालावालकर रुग्णालयाने “ वालावालकर दंत चिकित्सा योजना “राबविण्यास 2013 पासुन सुरवात करण्यात आली. हया योजनेद्वारे भविष्यात कोकणातील मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने हे पाहिले पाऊल आहे असे म्हणता येईल.रुग्णालयाने ह्या प्रोग्रामसाठी 2 डेंटल सर्जन्स , 2 सिस्टर्स, 2 असिस्टंट अपॉइंट केले. ह्या प्रोग्रामसाठी 2 गाड्या उपलब्ध करून दिल्या. जिल्हा परिषदेतील सर्व शाळांमधून जाऊन विद्यार्थ्यांची दंत चिकित्सा करण्यास सुरुवात केली.
दंत चिकित्सा करणे, मुखाचे आरोग्य तपासणे , दातांची ठेवण आणि किडक्या दातावर उपचार चेक करणे,आणि टूथ पेस्ट आणि ब्रशचा वापरला प्राधान्य देण्यासाठी पेस्ट आणि ब्रशचे मोफत वाटप, कॅन्सर विषयी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची जनजागृती करणे, ज्या विद्यार्थ्यांना दांतांच्या समस्या असतील त्यांना वालावालकर रुग्णालयात आणून त्यांच्यावर मोफत उपचार करणे असे या योजनेचे स्वरूप आहे.
आज पर्यंत कोकरे, धामण देवी , वातड, कुठारे, कोसंबी, साखरपा , देवरुख, जानवले, वेलनेश्वर, परचुरी मिरजोळी, नातूनगर, बोरघर, संगमेश्वर, गुहागर, कुशिवडे नारदखेरकी अशा शेकडो गावातल्या जवळजवळ ११४९ शाळांमधून शिबिरामध्ये ५९००० हजार विद्यार्थ्यांची मुखाचे आरोग्य तपासणी करून असे आढळले की बऱ्याच विद्यार्थ्यांचे दात किडले आहेत. त्या करता त्यांना टूथ पेस्ट अँड ब्रश वाटप केले गेले. ज्यांना दानाच्या किडीचे प्रमाण जास्त आहे अशा २६००० मुलाना वालावलकर रुग्णालयात आणून त्यांच्यावर मोफत चांदी भरणे रूट कॅनॉल असेही उपाय केले गेले. हा सर्व खर्च श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्टने ने उचललं आहे .उद्देश हा की भविष्यात मुखाच्या कर्करोगाच्या समस्येला आळा बसावा आणि भावी पिढी सुदृढ व्हावी असा आहे.
दंतचिकित्सक डॉकटर संगीत वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉकटर अश्विनी गजकोष, डॉक्टर दीपक पाटील, डॉकटर प्रियांका,सेजल यांनी काम पाहिले आणि गावागावातील जिल्ला परिषदांच्या शाळांना भेटी देऊन ,समुपदेशन करून तपासणी आणि उपचार केले गेले.