रत्नागिरी:-डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम शिरगांव, रत्नागिरीच्या तृतीय वर्षाच्या ७ विद्यार्थ्यांसाठी ‘ॲक्वाकल्चर इंजिनिअरिंग ‘ या विषया अंतर्गत विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. संजय भावे सर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, आणि सहयोगी अधिष्ठाता, कृषी तंत्रज्ञान शिक्षण डॉ. ठोकळ सर यांची परवानगी व मार्गदर्शनाखाली श्री. संतोष सोनावणे यांच्या मालकीच्या नाशिक बायोफ्लॉक, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यानुभव प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कुणाल बिडू, विपुल मोहिते, विष्णुकांत पवार, विजय बोलभट, प्रसाद जाधव, प्रथमेश जाधव, ओसामा खोत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून तेथे तिलापिया आणि शोभिवंत माशांचे संवर्धन विषयक सखोल ज्ञान आत्मसात करत आहेत.
प्रशिक्षणा अंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांनी तिलापिया आणि शोभिवंत माशांच्या संवर्धनाचे बायोफ्लॉक तंत्रज्ञान, यासाठी लागणारी यंत्रसामग्री, तसेच बायोफ्लॉक युनिट स्थापन करणे आणि व्यवस्थापन व मार्केटिंग यांचा अभ्यास करत आहेत.
सदर प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी नाशिक बायोफ्लॉक कंपनीचे अधिकारी, कर्मचारी सहकार्याने मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम संस्थेचे प्राचार्य/सहयोगी अधिष्ठाता डॉ. आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.