बीड:-सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे ग्रामस्थ संतप्त झालेत. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय.
तर धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. त्यासाठी काल आंदोलन देखील केलंय. दुसरीकडे कराडची आज सीआयडी कोठडी संपलीय. याप्रकरणी आज केज न्यायालात सुनावणी पार पडलीय.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा, या मागणीसाठी बीड जिल्ह्यात सत्ताधारी आणि विरोधकांच्या नेत्यांनी निदर्शने केलीत. बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्येचा निषेध आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 28 जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बीड सरपंच हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या आईने पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली. तसेच कराड यांच्या सुटकेची मागणी केली.
माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला गोवण्यात आलंय. त्याला सोडण्यात यावं. माझं आयुष्य संपलं तरी मी येथून उठणार नाही, असं देखील वाल्मिक कराडच्या आईने सांगितलंय. वाल्मिक कराडच्या आईसह 50 जण निदर्शनात सहभागी झाले होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. खुनापूर्वी सरपंच देशमुख यांचाही छळ करण्यात आला होता. अवादा कंपनीविरुद्ध खंडणीचा प्रयत्न थांबवण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे खंडणीचे मोठे प्रकरण आहे. सरपंचाच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेग आला, त्यानंतर सात आरोपींना अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनी पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून ते कोठडीत होते.
याप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठही आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र सीआयडीचे विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत आहे.
वाल्मिक कराडसह विष्णू चाटेच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतला आहे. आज त्याच्या कोठीडीची मुदत संपणार आहे. याआधीच त्याच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतले आहेत. आवाजाचा नमुना महत्वाचा पुरावा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.