चिपळूण : गार्गी फाउंडेशन सावर्डे, ता- चिपळूण ही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी संस्था आहे. दरम्यान जि.प. प्राथमिक शाळा निवळी, चौसुपी नं.२ येथे रंग भरणे स्पर्धा पार पडली.
स्पर्धेचा मुख्य उद्देश मुलाना रंगसंगतीची जाणीव करून देणे हा होता. मुलांनी उत्साहाने आणी कल्पकतेने रंग भरत आपली कला सादर केली. परीक्षकांनी मुलांच्या कामाचे कौतुक करताना त्याच्या कल्पनाशक्ती आणी प्रयत्नांची प्रशंसा केली. स्पर्धेच्या शेवटी सर्व गटातील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. तर सर्व सहभागी मुलांनाही बक्षीस व खाऊ देऊन त्याच्या उत्साह वाढवण्यात आला.
यावेळी गार्गी फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. राहुल थोरात, संस्थेचे सदस्य श्री. सुजल गोपाळे , श्री. विश्वजीत गायकवाड, श्री. आर्यन धात्रक व जि.प.शाळेच्या मुखयादिपीका सौ.मंदा खाडे मॅडम व शिक्षक उपस्थित होते.