गुहागर तालुका बळीराज सेनेत इन्कमिंग जोरात
गुहागर:-बळीराज सेना पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांचे आदेशानुसार गुहागर विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख शरद बोबले व नवनिर्वाचित तालुका संपर्क प्रमुख संतोष निवाते यांचे मार्गदर्शन नुसार गुहागर तालुका बळीराज सेनेत विशेष फेरबद्दल करण्यात आले असून गुहागर मधील बळीराज सेनेत इनकमिंग जोरात सुरु आहे.
पक्षाचे वतीने गुहागर तालुका अध्यक्ष पदी वरवेली चे सामाजिक कार्यकर्ते व माजी तंटामुक्ती अध्यक्ष अरुण भुवड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष पदी पाभरे चे तरुण कार्यकर्ते संतोष पास्टे यांची निवड केली आहे सचिव पदी कायदेतन्य दिनेश कदम तर खजिनदार पदी पालशेत चे उद्योजक संतोष गोरीवले व सह खजिनदार म्हणून वेळणेश्वर चे तरुण कार्यकर्ते प्रमोद देवळे यांची नियुक्ती पक्षाने केली आहे.
पक्षाचे वतीने तालुका कार्यकारणी लवकरच जाहीर होणार असून ग्रामीण व शहर परिसरातील कार्यकर्ते बळीराज सेनेत मोठया संख्येने प्रवेश करीत आहेत पक्षलप्रमुख अशोकदादा वालम यांनी सर्व पदाधिकारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.