गुहागर:- पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व कार्य तत्पर पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांचा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे सत्कार करण्यात आला.
नेहमीच गुहागर पोलीस स्थानकाच्या कामामध्ये मग्न असणाऱ्या व बहुतांशी समाजामध्ये आपलेसे वाटणारे गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना त्यांच्या कामाची पोचपावती पोलीस अधीक्षक रत्नागिरी कार्यालयाकडून मिळाली असून त्यांच्या कार्याचे पोस्ट पावती म्हणून प्रशस्तीपत्रक देवून गौरव करण्यात आले आहे.नुकतेच रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. सचिन सावंत यांनी दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी गुहागर समुद्र किनारी एक तीन वर्षाचा मुलगा हरवलेल्या स्थितीत मिळून आला.
तसेच सर्च ऑपरेशन राबवून पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सदर मुलाच्या आईचा शोध घेऊन चांगली कामगिरी केली. तसेच गुहागर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. १००/२०२४ बी.एन.एस.३२५, ३(५) प्राण्यांचा छळ प्रति. कलम ११-१- घ.ड.च. मधील आरोपीस अटक करून मुद्देमाल जप्त करणेकामी चांगली कामगिरी केली. तसेच गुहागर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ९६/२०२४ वी.एन.एस. ७४,७९,मधील आरोपीस अटक करून गुन्हा उघडणीस आणनेकामी चांगली कामगिरी केली. असे अनेक गुन्हे गुहागर पोलीस ठाण्यामधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने उघडकीस आणले.या प्रशंसनीय कामगिरीबद्दल संबंधित विभागाकडून प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. भविष्यात ज्या ज्यावेळी आवश्यकता भासेल त्या त्यावेळी आपण अशाच प्रकारे उत्तम कामगिरी बजावत रहाल व पोलीस दलाचे नाव उज्ज्वल कराल अशा आशयाचे प्रशस्तीपत्र देण्यात आले. संपूर्ण तालुक्यातून त्यांच्या कार्याबद्दल व गौरवाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.