संगमेश्वर:-धामापूर तर्फे आज देवरुख येथे सद्गुरू श्री कडसिद्धेश्वर महाराजांचे पवित्र दर्शन घेण्याचा सौभाग्य लाभले.या भक्तिमय क्षणी आमदार शेखर निकम यांनी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून समाजहित व विकास कार्यासाठी नवीन प्रेरणा मिळवल्याचे सांगितले.
महाराजांचे शांत व आध्यात्मिक वातावरणात दर्शन घेताना अनोखी सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली यावेळी श्री.शेखर निकम यांनी महाराजांशी चर्चा करत त्यांच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित केले.महाराजांच्या आशीर्वादाने प्रत्येकाला जीवनात शांती,समाधान आणि समाजसेवेचा मार्ग सापडतो, असे शेखर निकम म्हणाले.
यावेळी परिसरातील अनेक भक्तगण उपस्थित होते.महाराजांच्या पवित्र उपदेशांमधून समाजाला प्रेरणा देणारा मार्ग सापडतो,अशी भावना भक्तांनी व्यक्त केली.या मंगलमय क्षणाने धामपूर तर्फे देवरुख व आजूबाजूच्या परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.महाराजांच्या आशीर्वादाने समाजहितासाठी चालू असलेल्या प्रकल्पांना यश प्राप्त होईल,असा विश्वास शेखर निकम यांनी यावेळी व्यक्त केला.