चिपळूण/संदीप घाग:-अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूण व वनदिन, आम्ही मिळून सारे यांचे संयुक्त विद्यमाने, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्या बद्दल साने गुरुजी उद्यान मधील कवी माधव यांचे शब्द शिल्पाचे सानिध्यात काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले, यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणारे स्नेहल दीक्षित, शशिकांत मोदी, दिलीप आंब्रे, भाऊ कार्ले यांचे हस्ते कवी माधव यांच्या काव्य शब्द शिल्पाला पुष्पहार अर्पण करून, काव्य वाचनाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी प्रस्ताविका मध्ये माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी सांगितले की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी ज्या ज्या साहित्यिकानी, व नेत्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे अभिनंदन करून मराठी भाषा प्रचार व प्रसार होण्यासाठी काव्य संमेलने, नाट्य, वक्तृत्व स्पर्धा होणे गरजेचे आहे.
काव्य मैफिलीसाठी जमलेले स्थानिक सुमारे एकवीस कवी, कवियत्री यांनी आपल्या कविता खुमासदार शैलीत सादर केल्या, कार्यक्रमाचे सूत्र संचालन भाऊ कार्ले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनीषा बिराजदार, माधवी भागवत, शक्ती चव्हाण, साहिल जांभळे, अजय यादव यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी चिपळूण पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल समीर जाधव, महेंद्र कासेकर, बाळू कांबळे यांचा प्रतिनिधिक स्वरूपात शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार माजी नगरसेवक शशी मोदी यांचे हस्ते करणेत आला.
यावेळी लो. टी. स्मा. चे कार्यवाह योगेश बंडागळे, विनायक ओक, शैलेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होतें.