नायशी उपसरपंच संदीप घाग यांच्या मागणीला यश
सावर्डे:-कोकरे नायशी, वडेर कळबुशी मार्गे 40 वर्षे नियमित सायंकाळी सुरु असणारी मात्र गत एकमहिन्यापासून बंद असलेली चिपळूण कासे एस टी फेरी राजापूर लोकसभे आमदार किरण सामंत याच्या सहकार्या मुळे 13 जानेवारी पासून पूर्ववत झाल्याने नायशीउपसरपंच संदीप घाग व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
चिपळूण कासे ( कोकरे नायशी, वडेर कळबुशी मार्गे ) 40 वर्षे नियमित सायंकाळी सुरु असणारी 4:45 वाजता सुटणारी एस टी फेरी चिपळूण आगरातून बंद केल्यामुळे विध्यार्थी वर्गाची शैक्षणिक नुकसान होत असल्याने 15 जानेवारी पर्यंत एस टी सुरू न झाल्यास नायशी उपसरपंच संदीप घाग यांनी पालक, विध्यार्थी वर्गासह 26 जानेवारी ला चिपळूण आगरातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
ही एस टी बंद झाल्याने पंचक्रोशीतील प्रवाशी तसेच विध्यार्थी वर्गाला फटका पडत होता मुलांना खेरशेत नायशी पायपीट करावी लागत होती , व आर्थिक फटका सहन करावा लागत होता त्यामुळं ही एस टि सुरू करण्यात यावी अशी मागणी संदिप घाग यांनी राजापूर विधान सभेचे आमदार किरण सामंत व पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदन द्वारे केली होती , याची दखल घेत किरण सामंत उर्फ भैय्या यांनी एस टी महामंडळास ही एस टी सुरू करण्यास आदेश दिले यामुळे विध्यार्थी व प्रवाशी वर्गाने सामंत याच्या सर्वसामान्य जनतेची वाहतुकी मार्ग सुखकर केल्याने प्रवाशी व विध्यार्थी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
तसेच एस टी महामंडळाच्या जिल्हाचे विभागीय नियंत्रक व चिपळूण आगर व्यवस्थापक चव्हाण याना ही एस टी फेरी सुरू केल्याबाबत उपसरपंच संदीप घाग व ग्रामस्थांनी आभार मानले आहेत